घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते

नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील (Nashik) नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतः लक्ष घातले असून तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे.

Nashik Crime News:  वडिलांच्या उपचारासाठी सोसला मानसिक छळ

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका पीडित तरुणीने केवळ आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हा ‘कॉर्पोरेट’ अत्याचार सहन केला. वडिलांची किमोथेरपी आणि औषधांच्या पैशांची गरज असल्याने, तिने वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि अपमान निमूटपणे सोसला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे “नोकरी टिकवणे” ही तिची अपरिहार्यता होती, ज्याचा फायदा नराधमांनी घेतला.

नाशिक क्राईम न्यूज : धर्मांतराचा छुपा अजेंडा

दुसरीकडे, एका दुसऱ्या पीडितेने राष्ट्रीय महिला आयोगासमोर धक्कादायक माहिती दिली आहे. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असताना, तिला नोकरीच्या बदल्यात धर्मांतर करण्याच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडण्यात आले. “वडिल आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत आणि घरची भूक मिटवण्यासाठी मला हे सर्व सहन करावे लागले,” अशी कैफियत पीडितेने मांडली आहे.

Nashik Crime News:  महिला आयोगाची कारवाई

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने काल TCS कंपनीला प्रत्यक्ष भेट दिली. सुमारे एक तास चाललेल्या या पाहणीत पथकाने खालील बाबींची तपासणी केली. पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विविध विभाग आणि सुरक्षितता, कॅन्टीन आणि वेटिंग रूममधील सीसीटीव्ही फुटेज व व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. महिला आयोगाने काही पीडित तरुणींशी संवाद साधून त्यांची ‘आपबिती’ जाणून घेतली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आयोगाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. आजच्या चौकशीत काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट; मेडिकल सर्टिफिकेट अन् विश्रांतीचा सल्ला, नेमकं काय घडलं?

Nida Khan: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ निदा खानची हकालपट्टी, नामांकित कंपनीचं ‘ते’ पत्र समोर, नेमकं काय म्हटलंय पत्रात?

आणखी वाचा

Comments are closed.