कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही अन् तब्बल 70 कोटींचं कंत्राट मिळवलं, गुन्हा दाखल
नाशिक क्राईम न्यूज : कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष यांच्या बनावट सहीने तब्बल 70 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळा (Simhastha Kumbhmela) संदर्भात कामांची वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी अज्ञाताने कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही वापरून गैरप्रकार (नाशिक क्राईम न्यूज) केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (गुन्हे बातम्या) दाखल करण्यात आला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Nashik Crime News : बनावट सहीद्वारे 35 कोटी रुपयांचे दोन वर्क ऑर्डर, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
मिळलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अज्ञाताने बनावट सहीद्वारे 35 कोटी रुपयांचे दोन वर्क ऑर्डर तयार केल्याची माहिती आहे. मात्र, कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांना आपली सही नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाहे. सिंहस्थ कामांच्या लगीन घाईत हात मारण्याचा हा प्रयत्न असून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फक्त या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.