पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिकमध्ये गुन्हेगारी सुरूच, आता चार जणांनी युवकाला संपवलं; वर्दीचा
नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिक शहर व परिसरात खूनाच्या घटनांनी उग्र रूप धारण केले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Police Station) हद्दीत गोरेवाडी परिसरात एका 24 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. कृष्णा दीपक ठाकरे असे मृत युवकाचे नाव असून, गुरुवारी (दि. 2) रात्री सुमारे पावणे बारा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. (Nashik Crime News)
प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी कुरापत काढत धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कृष्णा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने कृष्णा याला बिटको रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
Nashik Crime News : पोलिसांचा तपास सुरू, मारेकरी अद्याप फरार
घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांमार्फत तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत व काही संशयितांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
Nashik Crime News : नाशिकमध्ये खुनांचा धडकी भरवणारा आकडा
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत शहरात तब्बल 42 खून झाल्याची नोंद आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच खुनाच्या घटनेने खळबळ उडाली असतानाच, दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने एकूण खुनांची संख्या आता 43 वर पोहोचली आहे.
Nashik Crime News : पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान
दररोज घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि कायदा-सुव्यवस्थेवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक पोलीस शहरातील कायदा-सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी काय ठोस पाऊले उचलणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Nashik Crime News : नाशिकरोड परिसरात वाहनांची तोडफोड
दरम्यान, विजयादशमीच्या पहाटे नाशिकरोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या तिघा टवाळखोरांनी कोयत्यांच्या जोरावर चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, नाशिकरोडची गुन्हेगारी थांबणार तरी कधी? असा सवाल व्यक्त केला जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.