देशी दारु ढोसून उडाले खटके, नशेत धुंद असलेल्या एकाने लाकडी दांडक्याने वार करत दुसऱ्याला संपवलं;
नाशिक गुन्हा: नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत येणाऱ्या दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारू दुकानासमोर मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीचा लाकडी दांडका डोक्यात मारून खून करण्यात आला. गणपत घारे (50, उंटवाडी, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणात समोद कौर (35) या इसमाला अटक करण्यात आली आहे.(Nashik Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणपत घारे आणि समोद कौर हे दोघेही एका देशी दारू दुकानासमोर बसून दारू पित होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. बाचाबाचीचा सूर चढत गेल्यानंतर समोद कौर याने जवळच असलेल्या लाकडी दांडक्याने गणपत घारे यांच्या डोक्यात जोरात वार केला. या गंभीर मारामुळे गणपत घारे यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीला पोलिसांकडून तत्काळ अटक
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आरोपी समोद कौर याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडताना दोघेही पूर्णपणे दारूच्या नशेत होते. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.
नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणारा ताब्यात
दरम्यान, नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. समाधान केवलराव जगताप याला आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका येथील वाघ्या मुरळी हॉटेल परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी खंडणी विरोधी पथक स्थापन केले आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी खंडणी विरोधी पथक स्थापन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यानुसार पोलीस नाईक भूषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारूदत्त निकम यांना संशयित आरोपी समाधान जगताप नाशिकमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने 7 जुलै 2025 रोजी शहरात विविध ठिकाणी पथकाने सापळा रचला. त्यावेळी समाधान जगताप हा नांदूर नाका येथे मिळून आला. सदर आरोपी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या फसवणुकीप्रकरणी पाहिजे होता. तो स्वतःला वकील असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करत होता, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.