बॉस, मामा, बाबासह नाशिकमधील बड्या नेत्यांची दिवाळी कोठडीतच, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह; निवड


नाशिक गुन्हे: सर्वत्र दिवाळीचा आनंद, रोषणाई आणि भेटवस्तूंचा उत्सव सुरू असताना, नाशिक शहरातील काही राजकीय नेत्यांची दिवाळी (Diwali 2025) मात्र तुरुंगातच साजरी होत आहे. गुन्हेगारी (Nashik Crime) पार्श्वभूमी असलेल्या या नेत्यांवर विविध गुन्ह्यांची नोंद झाल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, आगामी निवडणुकीत त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nashik Crime: मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी कोठडीत ‘दिवाळी’

शहरात दिवाळीच्या निमित्ताने अनेक नेते आणि संभाव्य उमेदवार भेटवस्तूंचे वाटप, सामाजिक कार्यक्रम आणि सेवा उपक्रमांद्वारे मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही नेत्यांना पोलिसांच्या (Nashik Police) कारवाईची भीती वाटत असल्याने त्यांनी शहराबाहेर आश्रय घेतला आहे. तर काहींची दिवाळी थेट तुरुंगातच गेली आहे.

Nashik Crime: अनेक नेते न्यायालयीन कोठडीत

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही नामवंत नेते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात आरपीआय जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, भाजप नेते मामा राजवाडे, अजय बागूल, माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि उद्धव निमसे यांचा समावेश आहे. हे सर्व सध्या विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहेत.

Nashik Crime: ‘शिंदे’ गटातील नेत्यांवरही गुन्हे दाखल

दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक योगेश शेवरे, पवन पवार आणि विक्रम नागरे यांच्यावरही वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हेही पोलिसांच्या रडारवर असून हे नेते नशील शहर सोडून बाहेरच आश्रय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Crime: निवडणुकीत तिकीट मिळणार का?

या नेत्यांच्या अडचणींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या राजकीय अस्तित्वावर संकट ओढवले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि चालू न्यायालयीन प्रकरणे पाहता, पक्ष त्यांना उमेदवारी देणार का? तसेच मतदार अशा नेत्यांवर विश्वास ठेवतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. ज्या काळात इतर नेते जनतेत उतरून प्रकाशोत्सव साजरा करत आहेत, त्या काळात काहींच्या आयुष्यातील दिवाळी मात्र तुरुंगातील चार भिंतींमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात या वर्षीची दिवाळी ‘राजकीय अंधारात’ गेल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

आणखी वाचा

Sanjay Raut on Congress: आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता! काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा ‘रोखठोक’ टोला, बिहारचाही आरसा दाखवला

आणखी वाचा

Comments are closed.