नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच य

नाशिक निवडणूक 2026: आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik NMC Election 2026) पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या (BJP) विरोधात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली असून, याबाबतची महत्त्वाची चर्चा मध्यरात्रीपर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात युती संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आज शिवसेना–राष्ट्रवादी युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Election 2026: उमेदवारी अर्जांसाठी अवघे दोन दिवस

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची धावपळ वाढली असून, शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलत असल्याचं चित्र आहे. भाजपकडून “100 प्लस” जागांचा नारा दिला जात असून, भाजप स्वबळावरच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीसह, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी बहुपक्षीय लढत होणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

Nashik Election 2026: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक मनपा सर्वांसाठी महत्त्वाची

आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता नाशिक महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था न राहता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बनली आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी हजारो कोटींच्या निधीचे नियोजन होणार असल्याने, मनपावर सत्ता कोणाची असेल याला मोठे राजकीय महत्त्व आहे.

Nashik Election 2026: नाशिकमध्ये चौरंगी लढतीचे संकेत

सध्याच्या राजकीय हालचाली पाहता नाशिकमध्ये भाजप, शिंदे गटाची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे बंधूंची शिवसेना–मनसे युती व काँग्रेस अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेची राजकीय गणिते जुळलीच तर शिवसेनेला बरोबर घेऊन भाजप लढेल. ठाकरे बंधू हे काँग्रेसला बरोबर घेऊन लढतील, असे बोलले जात आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. तसेच, कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन शिंदे यांची शिवसेनादेखील स्वबळ आजमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक ही राज्यातील लक्षवेधी निवडणूक ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतील 67 वॉर्डमधील वारं फिरणार, शिवसेना-मनसेची एकत्र ताकद गेमचेंजर ठरणार?

आणखी वाचा

Comments are closed.