डान्स क्लासचा हट्ट धरला, आई-वडिलांनी नकार देताच मुलीने हार्पिकची बाटली तोंडाला लावली, मुंबईच्या
नाशिक बातम्या: नाशिक शहरामध्ये म्हसरूळ (Mhasrul) परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात हार्पिक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांनी लगेच डान्सचा क्लास लावावा यासाठी मुलगी हट्ट करत होती. मात्र क्लास न लावून दिल्याने मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मुलीवर मुंबईच्या के.ई. एम. हॉस्पिटल (KEM Hospital) येथे उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे. यासंदर्भात नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. (Nashik News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला डान्स क्लास लावायचा होता. त्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना डान्स क्लास लावण्याचा हट्ट केला. आई-वडिलांनी त्वरित डान्स क्लास लावून दिला नाही म्हणून मुलीला संताप अनावर झाला होता.
मुंबईच्या के.ई.एम रुग्णालयात प्राणज्योत मालवली
याच रागाच्या भरात मुलीने हार्पिक पिऊन घेतले होते. या घटनेनंतर मुलीला मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी पालकांनी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान मुंबईच्या के.ई.एम रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मुलीच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मुलांमध्ये सहनशीलतेचा अभाव वाढत चालला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांमधील सहनशीलता कशी वाढेल, याबाबत काळजी घ्यायला हवी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Nashik News : नाशिकमध्ये आत्महत्येची दुसरी घटना
दरम्यान, नाशिकमध्ये आत्महत्येची दुसरी घटना देखील समोर आली आहे. महिला पोलीस अंमलदाराच्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. “आई, तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च खूप आहे. तू ताण नको घेऊ, तुझी माझ्यामुळे धावपळ होते,” अशा चिठ्ठीतून आपल्या भावना व्यक्त करत 20 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूजा डांबरे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून, ती नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. पूजाची आई नाशिक पोलीस दलात कार्यरत असून, तिची नेमणूक अंमलदार म्हणून झाली आहे.
पूजाचे वडील व आई यांच्यात विभक्तपणा असल्याने ती आईसोबत राहत होती. मात्र आईच्या ड्युटीच्या तासांमुळे आणि कामाच्या स्वरूपामुळे पूजाला आईकडूनही पुरेसा वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती सतत नैराश्यात होती, अशी माहिती समोर आली आहे. पूजाने लिहिलेल्या चिठ्ठीतून तिने शिक्षणाचा वाढता खर्च, आणि त्यामुळे आईवर होणारा ताण याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तिला तिच्या आईच्या धावपळीमुळे मन:स्वास्थ्य लाभत नव्हते. या सर्व कारणांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरातील असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.