नवरा ठाकरे गटात अन् बायको शिंदे गटात; राहुल गांधींना काळं फासण्याची धमकी देणाऱ्या बाळा दराडेंच्

नाशिक: नाशिकमधील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना (Shivsena UBT) ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य काही नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली. त्यानंतर आता आणखी काही बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला (Shivsena UBT) सुरू असलेली गळती सुरूच असल्याचं चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपमहानगर प्रमुखांच्या पत्नी आणि माजी नगरसेवकांसह अनेक नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी ठाकरे गटातील माजी नगरसेवक किरण गामने, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. हे सर्वजण आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत या सर्वांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

नाशिकच्या माजी नगरसेविका किरण दराडे, यांनी बोलताना सांगितलं की,  मी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहे, कारण माझे वडिल हे हिंदूत्व या विचारांचे होते आणि त्याच विचारांसाठी मी पक्ष प्रवेश करत आहे. माझ्या प्रभागांत कोणतही काम होत नाही, आणि ते काम करण्यासाठी मी इथे आले आहे. माझे पती अजुनही उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाने केली नाही. उद्धव ठाकरे अजुनही काँग्रेसची साथ सोडत नाहीत, त्यामुळे आम्हाला हिंदूत्वसाठी या पक्षात यावं लागलं. माझी एंन्ट्री ही वडिलांमुळे झाली आहे आणि माझे पती यांचेही मत परिवर्तन होईल आणि ते ही येतील याचा विश्वास मला आहे, असंही त्यांनी पुढे म्हणाल्यात.

नवरा ठाकरे गटात बायको शिंदे गटात

नाशिकमधील काही नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटातील दोन माजी नगरसेविका प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. किरण बाळा दराडे आणि सीमा निगळ यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार आहे. राहुल गांधी यांना काळं फसण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या किरण दराडे पत्नी आहेत. बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटात राहणार आहेत तर किरण दराडे शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत. नवरा ठाकरे गटात आहे तर बायको शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे.

राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासण्याची धमकी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही, असंही बाळा दराडे यांनी म्हटलं होतं. बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील उप महानगरप्रमुख आहेत. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत काही अपशब्द वापरले होते, त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो, असं बाळा दराडे यांनी म्हटलं होतं. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू…जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=BWYBCWCMCPK

आणखी वाचा

Comments are closed.