शिवसेना-मनसेच्या बैठकीत राडा, ठाकरेंच्या दोन बड्या नेत्यांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं?

नशिक शिवसेना यूबीटी एमएनएस बैठक: एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात रंगल्या आहेत. त्यातच आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांवर विशेष चर्चा या बैठकीत करण्यात येत होती. मात्र याच बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे (Jayan Dinde) आणि विनायक पांडे (Vinayak Pande) यांच्यात वाद झाला. यानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. आता या बैठकीतील राड्याची जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख पदाधिकारी आपले विचार व्यक्त करत होते. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या शेवटी विधानसभा निवडणुकीचे स्वतःचे अनुमान मांडले. त्यात नाशिक मध्यमधून वसंत गीते यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे आपण नीट हाताळले नाही. तो मुद्दा जर प्रचारात घेतला नसता तर आपला विजय झाला असता, असे त्यांना म्हटले.

विनायक पांडे यांनी घेतला बैठकीतून काढता पाय

त्याचवेळी वसंत गीते यांचे जवळचे मित्र आणि माझे महापौर विनायक पांडे हे उभे राहिले. कारण वसंत गीते आणि विनायक पांडे या दोघांनी मिळून प्रचाराची संपूर्ण रणनीती आखली होती. यानंतर विनायक पांडे यांनी जर 40 वर्षांमध्ये आम्ही आमचा लढा देत होतो, तर आम्ही 40 वर्ष नेमकं केलं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर जयंत शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माफी देखील मागितली. मात्र, विनायक पांडे हे कार्यालयातून संतापून बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. तर जयंत दिंडे हे बैठकीसाठी कार्यालयात होते. आता या वादाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

https://www.youtube.com/watch?v=fbko03dr4es

आणखी वाचा

राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; मनोज जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन

उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.