नाशिकमधील पोलीस अंमलदारास ‘भाईगिरी’ भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई

नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील (Nashikroad Railway Station) एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना पोलीस अंमलदाराने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशाल झगडे (Vishal Zagade) असे या अंगरक्षकाचे नाव आहे. आता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण (Ramkrishna Hotel) येथे ते व्यवस्थापक असून, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते हॉटेलमध्ये असताना संशयित पोलीस विशाल झगडे हा हॉटेलमध्ये आपल्या दोघा साथीदारांसह जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॉटेलमधील वेटर सीराज शेख यास बोलावून तंदूर रोटी मागितली होती.

तंदूर रोटी न दिल्याने वेटरवर रोखली रिव्हॉल्व्हर

त्यावेळी वेटरने तंदूर रोटी संपल्याचे सांगताच विशाल झगडे याने वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल झगडेने त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर रोखली आणि त्यास धमकावले. या प्रकारामुळे वेटरसह हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात संशयित पोलीस विशाल झगडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशाल झगडेचे निलंबन

याप्रकरणाची गंभीर दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने (Vikram Deshmane) यांनी घेतली असून संशयित पोलीस अंमलदार विशाल झगडे यास निलंबित केले आहे.  पोलिसांनी झगडे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.

नाशिकमध्ये भीषण अपघात

दरम्यान, नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात (Nashik Accident) घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण  सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे सर्वजण हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

आणखी वाचा

परळी सरपंच अपघातात फरार टिप्पर चालक पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयात हजर केलं, घातपाताचा संशय

अधिक पाहा..

Comments are closed.