निदा खानने पीडितेला घरी नेऊन दिलं नमाज पठणाचं प्रशिक्षण, फोनमध्ये आढळल्या इस्लामशी संबंधित 37 ऑ

नाशिक टीसीएस प्रकरण निदा खान : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक अत्याचार आणि सक्तीचे धर्मांतर प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्या चौकशीत पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. पोलिसांनी (Police) या प्रकरणात आतापर्यंत दाखल असलेल्या सर्व 9 गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. या चार्जशीटमधून सन 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अतोनात छळाचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.

Nashik TCS Case Nida Khan: पीडितेचे नाव बदलले; फोनमध्ये आढळल्या 37 ऑडिओ क्लिप

पोलीस तपासादरम्यान पोलिसांना पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून तिचे धर्मांतर केल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळाला आहे. आरोपींनी पीडितेचे नाव बदलून मुस्लिम नाव ठेवले होते. मुख्य आरोपी निदा खान हिने तपास दरम्यान पोलिसांना कबुली दिली आहे की, तिने पीडितेला स्वतःच्या घरी नेऊन नमाज पठणाचे प्रशिक्षण दिले होते. एवढेच नव्हे तर, पोलिसांनी पीडितेचा फोन तपासला असता, त्यात इस्लाम धर्माशी संबंधित तब्बल 37 ऑडिओ क्लिप आणि 4 विशेष इस्लामिक ॲप्स आढळून आले आहेत.

Nashik TCS Case Nida Khan: झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून ‘ब्रेनवॉश’

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अधिकृत दोषारोपपत्रात थेट कट्टरवादी झाकीर नाईकच्या (Zakir Naik) नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश (Brainwashing) करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने केला जात होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

Nashik TCS Case Nida Khan: दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांचा क्रूर कट

पोलिसांच्या चार्जशीटनुसार, आरोपी दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेच्या असहायतेचा फायदा घेतला. आरोपींनी पीडित तरुणीला 2022 मध्ये टीसीएस कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. त्यानंतर हिंदू देवदेवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून त्यांनी पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्या. मुख्य आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच तिच्या जातीवरून अपमानास्पद शब्द वापरून मानसिक छळ केला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मतीन पटेल याने मुख्य आरोपी निदा खानची अटक टाळण्यासाठी तिला आश्रय दिल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

Nashik TCS Case Nida Khan: बुरखा घालण्याची सक्ती आणि ऑफिसच्या पॅन्ट्रीत विनयभंग

पीडितेच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने इस्लामिक ॲप्स डाऊनलोड करून तिला सातत्याने धार्मिक रील्स, व्हिडिओ आणि पुस्तके वाचण्याची सक्ती केली जात होती. “जर तू नमाजपठण केले नाहीस, तर तुझे कुटुंबीय नरकात जातील,” अशी भीती दाखवून तिचे मानसिक खच्चीकरण केले गेले. तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले गेले, तसेच रोजा ठेवण्यासाठी दबाव आणला गेला.

शारीरिक शोषणासोबतच मुख्य आरोपी दानिशने पीडितेकडून किमती वस्तू आणि मोठी रोख रक्कम लुबाडली. तर दुसरीकडे, दुसरा आरोपी तौफिक अत्तार याने थेट ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग करत अश्लील चाळे केल्याचे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण संवेदनशील प्रकरणात तपास यंत्रणांकडून अधिक सखोल तपास सुरू असून, नाशिक पोलिसांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले आहेत. आता या प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Nashik TCS Case: निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट

Comments are closed.