बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश, आता भाजप अन् शिवसेनेचे संकटमोचक तडकाफडकी नाशिकला आले; गोकुळ गी
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला (Mahayuti) मोठा हादरा बसला असून, बंडखोरीचे वादळ शमवण्यात नेत्यांना अपयश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी माघार न घेतल्याने भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अपयश आले आहे. या राजकीय घडामोडींनंतर हे दोन्ही नेते आज नाशिकमध्ये दाखल झाले असून निवडणुकीचा सविस्तर आढावा घेणार आहेत. महाजन आणि सामंत यांची शिष्टाई आज कामी येणार का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मंत्री गिरीश महाजन आज बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीला जाहीर पाठिंबा द्यावा, यासाठी शिवसेना आणि भाजपकडून त्यांच्यावर दबाव वाढवला जात आहे. मात्र, गोकुळ गीते हे अजूनही आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या अधिकृत वेळेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात फिरकलेच नव्हते. त्यामुळे गोकुळ गीते आणि भाजपचे मालेगावचे नेते प्रसाद हिरे (Prasad Hire) यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत आता महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे असा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: शेवटच्या क्षणापर्यंत ड्रामा; राज्यभरातून चक्रे फिरली
अर्ज माघारीच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात फोनवरून सातत्याने चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनीही फोनवरून संपर्क साधून बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या मिनिटांपर्यंत प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येत गोकुळ गीते यांचे बंधू आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आपला अर्ज मागे घेतला. परंतु, त्यांचे बंधू गोकुळ गीते निवडणूक रिंगणात कायम राहिल्याने शिवसेना-भाजप युतीची कोंडी झाली आहे.
Gokul Gite: गोकुळ गीते काय निर्णय घेणार?
कुणाल दराडे यांनी फोनवरून दिलेल्या धमकीमुळे आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, बंडखोरी पूर्णपणे मोडून काढण्यात अपयश आले असले, तरी गिरीश महाजन आणि उदय सामंत हे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. गोकुळ गीते यांचा जाहीर पाठिंबा मिळवून घेण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. आता गोकुळ गीते नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Girish Mahajan: गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
गोकुळ गीते यांच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आज स्वच्छता अभियान कार्यक्रम दुपारपर्यंत आहे आणि दुपारनंतर मी स्वतः गोकुळ गीते यांची आणि इतर संबंधितांसोबत चर्चा करणार आहे. गोकुळ गीते यांची मनधरणी केली जाईल, त्यांचा जाहीर पाठिंबा होण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. काल गोकुळ गीते यांच्यासोबत माझं बोलणं झालं, मात्र ते नंतर नॉट रिचेबल झाले. आमची चर्चा सुरू आहे, चर्चेनंतर आम्ही स्वतः त्यातून मार्ग काढू, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.