पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर (Rajya Sabha Election 2026)झाल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी 3, झारखंडमधून 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममधून प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील (सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली) आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील याच दिवशी होईल. आगामी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. याचदरम्यान, एक महत्वाची घडामोड घडत असल्याचं दिसून येत आहे.
माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र आपल्या कोट्यातील जागा नवनीत राणा राष्ट्रवादीसाठी सोडणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या भेटीगाठीमुळे सुनेत्रा पवारांच्या जागी नवनीत राणा यांची वर्णी लागते का?, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. (NCP Rajya Sabha Election 2026)
राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर कुणाची वर्णी? (NCP Rajya Sabha Election 2026)
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीची राज्यसभेतील हीच एक जागा सध्या रिक्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची देखील राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 4 नावांची चर्चा- (NCP Rajya Sabha Election 2026)
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते अशी चर्चा होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी फारसा इच्छूक नसल्याचं समजतं.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
- नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
- मतदानाची तारीख: १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)
- मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
नवनीत राणांच्या भेटीगाठी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.