नवी मुंबईतील बिल्डर गुरु चिचकरांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं, मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

नवी मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील गुरु चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या (Guru Chichkar Suicide ) केल्याची घटना घडली. चिचकर यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्यांच्या मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी गुरु चिचकर यांली लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकार यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकर यांनी एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील आहेत. नवीन चिचकर हे सध्या देश सोडून पळून गेले आहेत. नवीन चिचकर हे एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवे आहेत.

नवीन चिचकर देशाबाहेरुन चालवतात ड्रग्जचा व्यवसाय

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवतात. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकार यांनी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. गुरू चिचकार यांनी डोक्यात गोळी झाडली असून नवी मुंबई पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. NCB ने नवीन चिचकर विरुद्ध RCN (लूक आऊट नोटीस) देखील जारी केले आहे.
आत्महत्या करण्यासाठी 9  M M गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

महत्वाच्या बातम्या:

बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल, मृतदेह प्रियकराच्या घरी सापडला, जालन्यात खळबळ

अधिक पाहा..

Comments are closed.