नवी मुंबईत भाजप-शिंदे गटाचा तुफान राडा, शिवसैनिकाला कॉलर पकडून बेदम चोपलं, पैसे वाटल्याचा आरोप

भाजपा विरुद्ध शिवसेना नवी मुंबई निवडणूक 2026: नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे कमालीची रंगतदार झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे (मराठी) आणि गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील वाकयुद्धामुळे नवी मुंबईतील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ही घटना घडली. (Navi Mumbai Mahangarpalika Election 2026)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहेत. शिंदे गटाचा कार्यकर्ता कोपरखैरणे गावात मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता हातात सापडल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. दोन्ही बाजूंनी भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या कार्यकर्त्याला फटकावत होते. त्याच्या थोबाडीत मारण्यात आल्या. या कार्यकर्त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याला गळा आवळला. मात्र, शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता कसाबसा निसटून भाजपच्या फौजेशी एकटाच लढत होता. मला मारु नका, असे तो वारंवार बजावत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मतदानापूर्वी नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Latur Mahanagarpalika Election 2026: लातूरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पैसेवाटपाचे राजकारण

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना वातावरण अधिक तापू लागले आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरून प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजपच्या एका उमेदवाराच्या नातेवाईकाला मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, “मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर पडलो होतो. माझ्याकडे असलेले पैसे हे माझे स्वतःचे आहेत. माझा कोणत्याही प्रकारे निवडणूक किंवा पैसे वाटपाशी संबंध नाही,” असा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या खिशातून मतदारांची नावे तसेच उमेदवाराचे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर सदर व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे लातूर महापालिका निवडणुकीतील प्रचाराला आणखी धार चढली असून, पैसे वाटपाच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

आपण एकटे पडलो तरी काफी आहोत, राज ठाकरेंची मुंबईतील मराठी माणसाला साद, एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट

आणखी वाचा

Comments are closed.