अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अकोला : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) भंडाऱ्याचे आमदार पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात दोषी ठरल्याने अडचणीत आले आहेत. मात्र, न्यायालयाने दोन वर्षात शिस्तीत राहण्याची तंबी देत आमदार कारेमोरेंसह त्यांच्या चार सहकाऱ्यांची बंद पत्रकावर सुटका केली. मात्र, एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) दोषी ठवरत 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे, कोकाटेचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात, अडचणीत आली असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तीन वर्षांपूर्वी आमदार राजू कारेमोरे यांच्या मित्राचे 50 लाख रुपये पोलिसांनी लुटल्याची घटना घडली होती, तेव्हा आमदारांनी पोलिसांना (Police) शिवीगाळ केल्याचं प्रकरण दाखल झालं होतं.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाे एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. तर, भंडाऱ्यात आज राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना, दोन वर्षात शिस्तीत राहण्याची तंबी देत एका प्रकरणात मुक्तता केली. भंडाऱ्याच्या तुमसर-मोहाडी विधानसभेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे हे एका प्रकरणात आज दोषी असल्याचा निर्णय भंडारा जिल्हा सत्र न्यायालय द्वितीय श्रेणीच्या न्यायाधीश भारती काळे यांनी दिला. मात्र, यासोबतच आमदार कारेमोरे हे लोकप्रतिनिधी असून त्यांच्यासह त्यांचे चार आरोपी सहकारी यांचीही जनमाणसांत चांगली वर्तवणूक असल्यानं त्यांना दोन वर्षांची तंबी देत सोडण्यात आलं.मात्र, यात न्यायालयानं आमदार राजू कारेमोरे आणि त्यांचे अन्य चार सहकारी आरोपींना पुढील दोन वर्षात कुणासोबत वाद किंवा भांडण नं करता समाजात लोकप्रतिनिधीला शोभेल अशी वागणूक ठेवण्याच्या अटी-शर्तीवर या प्रकरणातून मुक्तता केली आहे.
काय आहे प्रकरण?
आमदार राजू कारेमोरे 31 डिसेंबर 2021 रोजी यांचे मित्र यासीन छवारे आणि अन्य तीन जण वरठी येथून आमदार कारेमोरेंना भेटून तुमसरकडे जात होते. मोहाडी-तुमसर मार्गावर असलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूम परिसरात काही पोलिसांनी यासीन छवारे आणि त्यांच्या मित्रांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गाडीतील 50 लाख रुपये लुटल्याचा आरोप आमदार राजू कारेमोरे यांनी केला होता. या संतप्त प्रकरणानंतर आमदार राजू कारेमोरे 31 डिसेंबर 2021 च्या सायंकाळी मोहाडी ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. यात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आमदार कारेमोरे यांच्यासह त्यांच्या आरोपी चार सहकारी मित्रांना 3 जानेवारी 2022 मध्ये अटक केली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायाधीश द्वितीय श्रेणी तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी आज दिला. न्यायाधीशांनी आमदार राजू कारेमोरे यांना कलम 143, 294, 504 यात दोषी ठरविले. तर, कलम 353 मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि जनमानसात चांगली वागणूक आमदार राजू कारेमोरे यांच्यासह चारही आरोपींची असल्याचं न्यायालयानं नोंद घेतं त्यांची दोन वर्षांच्या बंद पत्रावर मुक्तता केली.
हेही वाचा
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
आणखी वाचा
Comments are closed.