खरे काय ते सांगा? मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र owhad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी प्रकल्पासाठी दिलेल्या निधीबाबतच्या आकड्यात तफावत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार MUTP प्रकल्पांसाठी 511.48 कोटी मिळाले, तर अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार MUTP 3 साठी 1465 कोटी 33 लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत ट्वीट करत आव्हाड यांनी खरे काय ते सांगा? असा सवाल केला आहे.
खरे काय ते सांगा???
मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या आकड्यात तफावत
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार MUTP प्रकल्पांसाठी 511.48 कोटी मिळाले
तर अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार MUTP 3 साठी 1465 कोटी 33 लाख रुपये मिळालेमुंबई मेट्रो साठी 1255…
मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी मिळाले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितल्याचे आव्हाड म्हणाले. तर अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर पुणे मेट्रो साठी 699 कोटी मिळाले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. तर पुणे मेट्रो साठी 837 कोटी मिळाल्याचे अजिततदादांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारी नुसार इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबई साठी 792.35 कोटी मिळाले तर यासाठी अजित पवार यांच्या आकडेवारीनुसार 652 कोटी 52 लाख मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार
अधिक पाहा..
Comments are closed.