सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली…; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारानं नाव न घेता रू

पुणे: नाशिकचे वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चाकणकर या खरातच्या पाया पडतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट कवितेच्या माध्यमातून चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या नैतिकतेवर बोचरी टीका केली आहे.खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथातील विचारांचा आधार घेतला आहे. एका प्रभावी कवितेच्या माध्यमातून त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.

अमोल कोल्हे काय म्हणालेत?

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत नाव न घेता ताशेरे ओढले आहेत. महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणे हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे, ही बाब गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला

जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!

त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली

सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.

काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली

सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली,

गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….

अमोल कोल्हे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथांचा संदर्भ दिला आहे. आधुनिक काळातही आपण विचारांच्या गुलामगिरीत अडकत चाललो आहोत का, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

नेमके प्रकरण काय? फिर्यादीत काय म्हटले?

नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत शहरातील कॅनडा येथील एका इमारतीमध्ये खरात याच्या कार्यालयात आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. खरात याने फिर्यादी महिलेचा भावनिक, धार्मिक विश्वास संपादन केला.
त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. संमोहित अवस्थेत २ पीडिता गेल्यानंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन खरातने वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कोण आहे कॅप्टन अशोक खरात ?

अशोक खरात हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेवेत होता. २२ वर्षे सेवा बजावल्यानंतर तो निवृत्त झाला. त्याने १५४ देशांमध्ये प्रवास केल्याची चर्चा आहे. सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी खरात, तर सदस्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. सेवानिवृत्तीनंतर अंक शास्त्र अन् ज्योतिषी म्हणून व्यवसाय सुरू केला. राज्यातील मोठे मंत्री खरातकडे ‘भविष्य’ जाणून घेण्यासाठी येऊ लागल्याने सर्वत्र तो चर्चेत आला. खासगी विमानाने प्रवास करण्यापासून त्याची ‘लॅव्हिश लाइफस्टाइल’ अनेकांना चक्रावून टाकणारी होती.

आणखी वाचा

Comments are closed.