BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्ह
मुंबई: राज्यात महानगरपालिका (Mahanagarpalika Election) निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच महानगरपालिका निवडणुकांमध्ये (Mahanagarpalika Election) महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित लढण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत, त्याचबरोबर युती, जागावाटप याबाबत चर्चा होत असल्याचं चित्र आहेत, याबाबत शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल (मंगळवारी, ता २३) रात्री बैठक पार पडल्याची माहिती आहे. तर या बैठकीत काही जागांवरून एकमत न झाल्याने युतीची चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे भाष्य केलं आहे. (Mahanagarpalika Election)
NCP Sharad Pawar: स्वबळावर जाणार की काँग्रेस किंवा ठाकरे सोबत जाणार उद्या स्पष्ट होईल
मुंबईबाबत आज वाट पाहू ठाकरे काय म्हणतायत, काँग्रेसच काय होतंय, याची वाट पाहू अन्यथा आम्ही आमचा निर्णय उद्याच जाहीर करू असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे, तर ठाकरेंकडून सन्मानजनक जागा मिळत नसतील तर पर्याय काय म्हणून आम्ही काँग्रेससोबत बातचीत सुरू केली आहे. स्वबळावर जाणार की काँग्रेस किंवा ठाकरे सोबत जाणार उद्या स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची महाविकास आघाडीत येण्याची मानसिकता आहे. पुण्यात आम्ही ३० ते ४० पेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २५ ते ३० जागा मागितल्या आहेत. संध्याकाळी ४ पर्यंत काँग्रेससोबत आमची चर्चा होईल. योग्य जागावाटप होणे अपेक्षित आहे. तरच महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ असंही पुढे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
NCP Sharad Pawar: चर्चा करत रहा आणि जो योग्य असेल त्यांच्या सोबत जा
तर मनसे शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं की, दोन्ही भावांची युती झाली त्यांना शुभेच्छा. आम्ही एकत्र लढलो तर सगळ्यांना फायदा होईल. शरद पवारांनी चर्चा करत राहा आणि जो योग्य असेल त्यांच्या सोबत जा असं सांगितलं आहे. सुप्रिया सुळे, मी आणि जयंत पाटील जागावाटपाबाबत ठाकरेंच्या सोबत बोलत आहोत. योग्य वेळी शरद पवार देखील बोलतील. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत आहोत अशी माहिती देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
NCP Sharad Pawar: शिवसेना ठाकरे गट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही फिस्कटलं?
काल (मंगळवारी, ता 23) रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ज्या जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे त्यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. कुर्ला विक्रोळी धारावी या भागातील जिथे 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते त्या ठिकाणी जागा देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेने नकार दिला आहे. त्यामुळे कुठेही तोडगा निघत नसल्याचे चित्र असल्याची चर्चा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी 30 जागांचा प्रस्ताव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र 15 ते 20 जागा देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेने जरी तयारी दर्शवली असली, तरी ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हवे आहेत त्या जागा ठाकरेंची शिवसेना देण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेस पक्षाकडे आपला प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्यामुळे जवळपास ठाकरे बंधूसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाण्याची शक्यता कमी दिसत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.