मागणी 35 जागांची, भाजपकडून फक्त 12 जागांची ऑफर, पुण्यात शिवसेना-भाजपची युती होणार का?
नीलम गोऱ्हे : महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election) बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती होणार की नाही? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
पुण्यात भाजपकडून शिवसेनेला केवळ 12 जागाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेकडून 35 जागा मागण्यात आल्या होत्या, अशी माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (नीलम गोऱ्हे) यांनी दिली आहे.
पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सन्मान जनक युती हवी
पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सन्मान जनक युती हवी आहे, ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. नाराजीनंतर भाजपने केवळ सेनेला दिल्या 15 जागा दिल्या आहेत. आम्हाला 20 ते 25 जागांची इच्छा आहे. आम्ही हा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवला असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
युतीसंदर्भात अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील
दरम्यान, युतीसंदर्भात अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्या सकाळ पर्यंत भाजपकडून काही आलं नाही तर आम्ही आमच्या चांगल्या उमेदवारांना फॉर्म देवू असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 29 त तारखेला आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करु अशी माहिती देखील नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. अजून कुठलाही अंतिम निर्णय झाला नाही. शेवटपर्यंत युती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार, 15 जानेवारीला मतदान होणार
राज्यातील गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकाची आणि नव्यानं तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 या दिवशी मतमोजणी पार पडेल. आजपासून 29 महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यानं प्रचाराच्या कार्यक्रमांना वेग येणार आहे. घरोघरी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.