NEET परीक्षेच्या निकालात गुणांचा गोंधळ, हिंगोलीतील विद्यार्थीनीने सोडवले 154 प्रश्न मात्र ओएमआरमध्ये दाखवले फक्त 54 प्रश्न
NEET परिक्षेच्या पेपरफुटीवरून देशभरात तणावाचे वातावरण असताना NEET च्या फेरपरिक्षेच्या निकालातही गोंधळ असल्याचे समोर आले आहे. हिंगोलीतील एका विद्यार्थीनीने 154 प्रश्न सोडवले होते मात्र ओएमआर शीटमध्ये फक्त 54 प्रश्न सोडवल्याचे दिसत आहे. स्नेहा इंगोले असे त्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
उत्तर परिक्षेतील अपेक्षित गुण व जाहीर झालेल्या गुणांमध्ये बरिच तफावत असल्याचा आरोप स्नेहाच्या कुटुंबियांनी केला आहे. स्नेहाला 479 गुण मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आता तिला 114 गुण मिळाले आहेत.
ओएमआरचा खूप मोठा गोंधळ झाला होता. खूप मुश्किलिने ओएमआर शीट मिळाली. पण जेव्हा मी ती शीट पाहिली तेव्हा मला धक्का बसला. माझी NTA ला विनंती आहे की त्यांनी मला माझी ओरिजनल ओएमआर शीट द्यावी, असे स्नेहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
Comments are closed.