ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी, रेल्वे मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ठाणे व मुलुंड स्थानकादरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्व:त मान्यता दिली आहे. वैष्णव यांनी याबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई महानगराच्या दळणवळणाला नवी गती!
🚉 ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीस तत्त्वतः मान्यता दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!
केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर… pic.twitter.com/wOGDUk9G22— देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) 8 मे 2026
ठाणे व मुलुंड ही दोन्ही उपनगरातील अत्यंत महत्त्वाची व वर्दळीची स्थानकं आहेत. या स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. या स्थानकांदरम्यानचे अंतर जास्त असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या दरम्यान एका नवीन स्थानकाची मागणी होत आहे.
Comments are closed.