निदा खान माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली…; मतीन पटलेने सांगितली भेटीची A टू Z माहिती
निदा खान-मतीन पटेल नाशिक TCS प्रकरण: नाशिमधील टीसीएस प्रकरणातील (Nashik TCS Case) आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलची (Mateen Patel) पुन्हा एकदा एसटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. मागील झालेल्या चौकशीत मतीन पटेलने एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याशी संपर्कात असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे आजच्या चौकशीत आणखी काय समोर येतं? हे बघणं महत्त्वाचं आहे. या चौकशीआधी मतीन पटेलने एबीपी माझाशी बोलताना निदा खानसोबतच्या भेटीची सगळी माहिती दिली आहे.
मी निदा खानला ओळखत सुध्दा नव्हतो. निदा खान माझ्या ऑफिसला आली होती. तिला मी 2-3 दिवसांसाठी रूम दिली होती. मला निदा खान कोण आहे हे माहिती नव्हतं. तिच्या आई वडिलांनी फोन केला होता की, मदत पाहिजे, अशी माहिती मतीन पटेलने दिली. तसेच मला निदा खानचा कॉल आला होता की, खारी आणि दूध पाहिजे म्हणून मी मुलाकडून पाठवलं होतं. मी ज्यांना घर विकलं, त्याला सुध्दा आरोपी केलं, त्याचं सुध्दा घर तोडण्यात आलं, असं मतीन पटेल म्हणाला. (Nida Khan-Mateen Patel Nashik TCS Case)
इम्तियाज जलील यांचा काहीही संबंध नाही- मतीन पटेल (Nida Khan-Mateen Patel Nashik TCS Case)
मी पोलिसांना म्हणालो की, मला इम्तियाज जलील यांना कॉल करू द्या. इम्तियाज जलील यांना काहीही माहिती नव्हती. इम्तियाज जलील हे माझे नेते आहेत, मला काहीही अडचण आली तर मी इम्तियाज जलील यांना फोन करतो. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा काहीही संबंध नाही, असं मतीन पटेलने स्पष्ट केले. निदा खान ही इम्तियाज जलील यांचे नातेवाईक नाही. जो कुणी सांगतोय ते खोट बोलतोय. माझं घर तोडून त्यांनी आई-वडील, भाऊ-वहिनी सर्वांना रोडवर आणलं आहे. त्यांनी आरोप खरे आहेत की खोटे आहे हे सुध्दा माहिती नाही, तरीही माझं घर पाडलं, असं मतीन पटेलने सांगितले. निदा खान ही इम्तियाज जलील यांचे नातेवाईक नाही. जो कुणी सांगतोय ते खोट बोलतोय. माझं घर तोडून त्यांनी आई-वडील, भाऊ-वहिनी सर्वांना रोडवर आणलं आहे. त्यांनी आरोप खरे आहेत की खोटे आहे हे सुध्दा माहिती नाही, तरीही माझं घर पाडलं. निदा खान वास्तव्याला होती, तेव्हा इम्तियाज जलील यांचा फोनच झाला नाही. माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग्स आहेत, इम्तियाज जलील यांचा काही संबंध नाही. पुढे कोर्टात लढाई लढणार, काही चुकीच केलं नाहीय, त्यामुळे कोर्टात लढणार, असंही मतीन पटेल एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
मतीन पटेल यांची आज पुन्हा चौकशी- (निदा खान-मतीन पटेल नाशिक टीसीएस प्रकरण)
निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचे काम एसआयटीकडून सुरू आहे. मतीन पटेलच्या फोनवरून एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत फोनवरून संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे. निदाला कोणाच्या सांगण्यावरून मतीनने आश्रय दिला याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे.मतीन पटेल पुन्हा आज नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार आहे. याआधी दोनवेळा मतीन पटेलची नाशिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.