पुणे पोलीस निलेश घायवळला फरफटत भारतात आणणार? पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली, आयुक्त ॲक्शन मोड
पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळचा (Nilesh Ghaywal) पासपोर्ट पुणे पोलीस (Pune Police) रद्द करणार असल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्याची माहिती आहे. निलेश घायवळने(Nilesh Ghaywal) बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचं तपासात उघड झाले आहे. घायवळने पासपोर्ट मिळवण्यसाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्र सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला. घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची पोलिसांना माहिती आहे. तर निलेश घायवळने (Nilesh Ghaywal)पासपोर्ट काढताना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्याने त्याच्यावर राज्यात कोठेही गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे, घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला याचा शोध सुरु आहे. (Nilesh Ghaywal)
Nilesh Ghaywal: पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे
मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोथरूड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड निलेश घायवळचे पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काल (शुक्रवारी, ३) दिली. घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी काल (शुक्रवारी, ३) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आहे.
Nilesh Ghaywal: पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश
पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. पण, घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे, यापूर्वी घायवळविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालयाने त्याला काही अटी आणि, शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्या वेळी घायवळला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
Nilesh Ghaywal: अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला
‘घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पासपोर्ट काढताना त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. त्याने अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला, पुणे पोलिसांनी तेथे त्याने दिलेल्या त्या आहिल्यानगरच्या पत्त्यावर छापा टाकला. मात्र, पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Nilesh Ghaywal: प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं समोर
घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्वतःविरुद्ध राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, असा दावा केला होता. मात्र प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Nilesh Ghaywal: नोटिशीला उत्तर नाही!
घायवळने ‘तत्काळ’ योजनेतून पासपोर्ट मिळवला होता. मात्र, पासपोर्ट मिळाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर तो वास्तव्यास नसल्याचे उघड झाले. यासंदर्भात पोलिसांनी पडताळणी करून तसा शेरा नोंदविला. पुढे पोलीस पडताळणी अपूर्ण राहिल्याने पासपोर्ट कार्यालयाने घायवळला नोटीस बजावली. तथापि, या नोटिशीला त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
आणखी वाचा
Comments are closed.