निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरीतून कोथरुडमध्ये जमवली माया


पुणे : शहरातील कोथरुड (Pune) येथे गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँग चांगलीच चर्चेत आली, तर गुंड निलेश घायवळच्याही (Nilesh ghaywal) मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. मात्र, पोलिसांचे हात निलेश घायवळपर्यंत पोहोचायच्या आत तो युरोपला पळून गेला, विशेष म्हणजे गुन्हे दाखल असतानाही त्याला पासपोर्ट मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पुणे पोलिसांनी त्याच्या कोथरुड येथील घराची झाडाझडती घेत 2 स्कॉर्पिओ आणि दुचाकी गाड्याही जप्त केल्या आहेत. आता, निलेशचा भाऊ सचिन घायवळच्या बंदुक परवान्यावरुन राजकारण तापलं आहे. सचिन घायवळला बंदुक परवाना मिळालाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच, सध्या चर्चेत असलेलं हे घायवळ कुटुंब मूळ पुण्यातलं नसून गेल्या काही वर्षातच ते जामखेडमधून (Ahilyanagar) पुण्यात स्थानिक झाल्याची माहिती समोर आली आहे.

निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे मूळ गाव हे जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून 10 किमीवर असलेल्या सोनेगावचे आहेत. सचिन घायवळ हा पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक आहे. सूर्य 2019 च्या असेंब्ली निवडणुकीत रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळ हा सक्रीय होता. तो जरी राजकारणात सहभाग घेत असला तरी तो शिक्षक असल्याने प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पदावर नव्हता. सूर्य 2019 ते 2024 पर्यंत रोहित पवारांसोबतच घायवळ बंधू हे देखील होते. सूर्य 2019 मध्ये रोहित पवारांना राजकीय मदत केल्याने स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर राजकीय पद यावर घायवळ समर्थकांची वर्णी लागावी म्हणून सचिन घायवळकडून प्रयत्न व्हायचे. त्यावरुनआमदार रोहित पवार आणि त्यांच्यात मतभेद झाले असल्याच चर्चा स्थानिक जामखेड मतदारसंघात आहे.

रोहित पवारांसमवेत मतभेद झाल्यानंतरच घायवळने त्यांची साथ सोडून 2024 मध्ये राम शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निलेश घायवळ आणि सचिन घायवळ याने राम शिंदेचा प्रचार केला, तसे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत, याबाबत जामखेड मतदारसंघातील स्थानिकांनी माहिती दिली.

सचिन घायवळविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने घायवळ कुटुंबीय फरार झाल्याचे समजते. विशेष म्हणजे सोनेगाव येथीलही निलेश घायवळचे कुटुंबीय फरार आहे. दुसरीकडे पोलिसांकडून घायवळ कुटुंबयांवर गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू आहे. त्यातच, निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप सचिन घायवळवर करण्यात आला आहे.

हेही वाचा

शिर्डीत व्यापाऱ्याकडून साईंचरणी सोन्याचं नक्षीदार ताट अर्पण; संस्थानकडून सत्कार, किंमत किती?

आणखी वाचा

Comments are closed.