पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, हे लिचंपिचं काँग्रेस सरकार नाही- नितेश राणे

सिंधुदुर्ग : पहलगम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून जगभरातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर, भारतानेही हल्ल्यानंतर पाकिस्तानला थेट इशारा देत 5 मोठे निर्णय घेतले आहेत. त्याच, अनुषंगाने राजकीय नेते आणि मंत्रीही आपली प्रतिक्रिया देताना दिसून येतात. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर थेट टीका केली. तसेच, हे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे, पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, असा धडा शिकवला जाईल, असे नितेश राणेंनी म्हटलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. 2014 नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही, हे गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही, हे मोदीजींचं केंद्र सरकार आहे. 2014 च्या नंतर आपल्या देशाकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेला आहे.. पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अबा पण वाकड्या नजरेने बघणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं.

आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला पाहिजे. हे मनमोहनसिंगांचं, लेच्यापेच्या काँग्रेसचं सरकार नाही, हे कणखर राष्ट्रभक्त, देशभक्तांचं सरकार आहे. मोदीजी पाकिस्तानला धडा शिकवतील. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिला का राजीनामा?

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागितला आहे, असा प्रश्न नितेश राणेंना विचारण्यात आला होता. त्यावर, शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता. भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार. त्याचा मालक ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का. त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय, असे म्हणत राजीनाम्याच्या प्रश्नावर राणेंनी संजय राऊतांवर पलटवार केला.

दरम्यान, चीपी विमानतळासंदर्भात विचारेलल्या प्रश्नावर राणेंनी भूमिका मांडली. बॅरिस्टर नाथ पै विमानतळाच्या नावासंदर्भात केंद्र शासनाकडे गेलेला आहे, आता तो अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री कार्यालय स्वतः याचा पाठपुरावा करत आहे. विमानतळावर नाईट लँडिंग व्हावी यासाठी खासदार नारायण राणे व मी एका महिन्यात तीन बैठका घेतल्या आहेत. आनंदाची बातमी अशी की त्या दिशेने वाटचाल देखील सुरू आहे. नाईट लँडिंगसाठी लागणारी वीज सुविधा आहे. त्या सुविधेला जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

हेही वाचा

मोठी बातमी! भारताच्या BSF जवानाने ओलांडली ‘बॉर्डर’; पाकिस्तान रेंजर्सने घेतलं ताब्यात

अधिक पाहा..

Comments are closed.