नितीन नबीन यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
विनोद तावडे यांच्यासह 16 जणांचाही समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राज्यसभा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर गुरुवारी काही नवीन सदस्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, आसामचे प्रमोद बोरो आणि बिहारचे उपेंद्र कुशवाहा यांचा प्रामुख्याने समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा खासदार म्हणून हा पहिलाच कार्यकाळ आहे. ते बिहारमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. तसेच बिहारचेच भाजपचे शिवेश कुमार यांनीही राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
बिहारमधून निवडून आलेले जनता दल (युनायटेड) चे रामनाथ ठाकूर यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली. ओडिशामधून भाजपचे सुजीत कुमार, छत्तीसगडमधून भाजपच्या लक्ष्मी वर्मा आणि छत्तीसगडमधून काँग्रेसच्या फूलोदेवी नेताम यांनी शपथ घेतली. आसाममधून भाजपचे तेराश गोवाला, भाजपचे जोगेन मोहन आणि यूपीपी(एल) चे प्रमोद बोरो यांनी शपथ घेतली. हरियाणातून भाजपचे संजय भाटिया आणि काँग्रेसचे करमवीर सिंग बौद्ध यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. याव्यतिरिक्त तेलंगणातून काँग्रेसचे वेम नरेंद्र रेड्डी, तसेच हिमाचल प्रदेशातून काँग्रेसचे अनुराग शर्मा यांनीही गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
Comments are closed.