‘हिटमॅन’ OUT! मुंबई संघात रोहित शर्माचं नाव नाही, चाहते हादरले… सूर्या अन् दुबेचाही पत्ता कट

रोहित शर्माचा मुंबई संघात समावेश नाही : मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफीसाठी (Mumbai squad for Vijay Hazare Trophy) जाहीर झालेल्या संघात रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव नसल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बीसीसीआयने सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचे निर्देश दिले असले, तरी सध्या रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे त्याचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आलेला नाही.

रोहित शर्माचं नाव गायब

याबाबत एमसीएच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केलं की, रोहित शर्मा आणि इतर भारतीय संघातील खेळाडू जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा त्यांचा संघात समावेश करण्यात येईल. सध्या ते खेळण्यासाठी उपलब्ध नसताना संघात नाव टाकणं योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईचा संघ नव्या संयोजनासह मैदानात उतरणार आहे. मात्र, रोहित केव्हा आणि कोणत्या सामन्यापासून विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह

माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांसारख्या मोठ्या नावांना विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, याचा अर्थ हे खेळाडू संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटला मुकणार आहेत, असे नाही. मुंबई सीनियर निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले की, “हे सर्व खेळाडू उपलब्ध झाल्यानंतर संघात सामील होतील. सध्या ते उपलब्ध नसताना त्यांना संघात जागा देऊन एखाद्या युवा खेळाडूला बाहेर काढणे योग्य ठरणार नाही.”

अजिंक्य रहाणे सुरुवातीचे सामने मुकणार

माजी भारत व मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्पर्धेच्या लीग टप्प्यातील सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी रहाणेने स्वतः विश्रांतीची विनंती केली आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे. त्यामुळे तो विश्रांती घेऊन रिकव्हरी करेल. पहिल्या एक-दोन सामन्यांनंतर तो मुंबई संघात सहभागी होईल,” अशी माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे.

मुंबईचे गट टप्प्यातील सामने आणि नवे चेहरे

विजय हजारे ट्रॉफीचा गट टप्पा 24 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. मुंबई संघाचा समावेश एलिट गट सी मध्ये असून या गटात सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रपंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. मुंबईचे सर्व गट टप्प्यातील सामने जयपूर येथे होणार आहेत. निवड समितीने सलामीवीर ईशान मुलचंदानीला प्रथमच संघात संधी दिली आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करता देखील युवा फलंदाज अंगकृष रघुवंशीला संघातून वगळले गेलेले नाही.

हे ही वाचा –

India Squad For 2026 T20 World Cup : शुभमन गिल IN, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग OUT…. 2026 च्या टी20 वर्ल्डकपसाठी अशी असेल टीम इंडिया, हे 15 धुरंधर जिंकवणार ट्रॉफी?

आणखी वाचा

Comments are closed.