164 विदेशी नागरिकांची सुटका
नोएडामध्ये ओलीस ठेवलेल्या 164 विदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. सुटका करणाऱ्यांमध्ये 92 इंडोनेशियन आणि 72 मलेशियन नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना आधी चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर फसवणूक करून घेतली जात होती. पोलिसांनी येथून 355 मोबाईल पह्न, 175 हून अधिक डेस्कटॉप आणि लॅपटॉप तसेच अनेक सिमकार्ड जप्त केले.
Comments are closed.