मध्यस्थ म्हणून पाकिस्तान विश्वास ठेवण्यासारखा नाही! इराणच्या सुरक्षा आयोगाच्या प्रवक्त्याचा बॉम्ब
‘पाकिस्तान हा आमचा चांगला मित्र आहे. शेजारी देश आहे, पण मध्यस्थ म्हणून विश्वास ठेवण्यासारखा नाही,’ असे परखड मत इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रवत्ते इब्राहिम राझेई यांनी मांडले.
इराण व अमेरिकेत शांतता करार घडवून आणण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. पहिल्या फेरीच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर दोन्ही देशांना दुसऱयांदा चर्चेच्या टेबलावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच इराणने आज नवा बॉम्ब टाकला.
‘पाकिस्तान नेहमी डोनाल्ड ट्रम्प यांचे हित ध्यानात घेऊन मुद्दे मांडतो. अमेरिकेच्या इच्छेविरुद्ध तो बोलतच नाहीत. मध्यस्थ हा निष्पक्ष असला पाहिजे. तो एका बाजूला झुकलेला नसावा’ असे राझेई म्हणाले.
17 हिंदुस्थानी खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला
होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱया टोगोच्या जहाजावर इराणी तटरक्षक दलाच्या जवानांनी सोमवारी गोळीबार केला. या जहाजावर 17 हिंदुस्थान खलाशी होते. हा गोळीबार केवळ इशारा देण्यासाठी होता. जहाजावरील सर्व हिंदुस्थानी खलाशी सुखरूप असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
Comments are closed.