भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बोईसरजवळ भीषण अपघातात तीन विद्यार्थी ठार
बोईसर-नवापूर रस्त्यावरील पामटेंभी गावाजवळ आज सायंकाळी साडेपाच वाजता भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मोहित वर्मा, रवी गुप्ता आणि नयना महातो अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. नांदगाव-आलेवाडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी दुचाकीवरून मुले निघाली होती. यावेळी हा अपघात झाला. मोहित हा बारावीमध्ये तर रवी आणि नयना हे दहावीमध्ये शिकत होते. तिघेही बोईसर येथील गणेशनगर परिसरातील रहिवासी होते.
मंगळवारी सायंकाळी तिघेही एकाच दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी निघाले होते. पामटेंभी गावाच्या हद्दीत पोहोचले असताना नवापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ट्रकचालक फरार
अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच बोईसर आणि सातपाटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठण्यात आले.
Comments are closed.