पालघरमध्ये महाआरतीचा गजर; श्रीराम मंदिरात शेकडो शिवसैनिक, पालघरवासीयांचे रामरक्षा आंदोलन
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर शहर शाखेच्या माध्यमातून आज हुतात्मा चौकात रामरक्षा आंदोलन छेडण्यात आले. शेकडो शिवसैनिक आणि पालघरवासीयांनी श्रीराम मंदिरात महाआरती करून राम मंदिरात झालेल्या लुटीचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.
पालघर शहरातील हुतात्मा चौकातील श्रीराम मंदिर परिसरात जिल्हाप्रमुख गिरीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी रामरक्षा आंदोलन छेडले. रामरक्षा आंदोलनात शिवसैनिकांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विकास मोरे, उपजिल्हाप्रमुख सुधीर तामोरे, डॉ. विश्वास वळवी, तालुकाप्रमुख जितेंद्र पामाळे, भीमसिंग कुऱ्हाडे, नचिकेत पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल ठाकरे, नगरसेवक आरिफ कलाडिया, राहुल पाटील, जिल्हा संघटक भावना किणी, नगरसेविका राधा पामाळे, समन्वयक सुनील महेंद्र, मोहन राणे, उपजिल्हा संघटक गीता संखे, उपतालुका संघटक रेखा पाटील, उपतालुकाप्रमुख ईश्वर पाटील, मनोज ठाकूर, विभागप्रमुख रोहन राऊत, विश्वास निकम, उपशहरप्रमुख विकी मोहिते, शहर संघटक अनुजा तरे, उपशहरप्रमुख अतुल गावड, कमलेश यादव यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments are closed.