Pandharpur Wari 2026 – संत तुकाराम महाराज यांची पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार, वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा… असे म्हणत पंढरपूर आषाढी वारीचे विठुरायाच्या भक्तांना वेध लागले आहेत. यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संत तुकोबांच्या वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि पालखी 7 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

पंढरपूर आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठू नामाचा गजर करत दिंड्या, पताका, टाळ, मृदुंग आणि तुळशी वृंदावन घेऊन निघतात. यंदा आषाढी एकादशी पुढील महिन्यात म्हणजे 25 जुलै रोजी आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीच्या वारीचे आतापासून नियोजन केले जात आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पायी वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तुकोबांची पालखी 7 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे तीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. तुकोबारायांच्या पालखीसह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचीही उत्सुकता वारकरी आणि विठ्ठलभक्तांना असते. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक कधी जाहीर होईल? याकडे वारकरी आणि भक्तांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.