संजय कुटेंच्या कार चालकाचा संशयास्पद मृत्यू; पत्नी सुनीता देशमुखांचं सुनीता देशमुख यांच दोन चिम
पंकज देशमुख मृत्यू प्रकरण: जळगाव जामोदचे भाजपा आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांचा कारचालक व भाजपा पदाधिकारी असलेल्या पंकज देशमुख यांच्या मृत्यूला (Pankaj Deshmukh Death Case) शंभर दिवस उलटूनही न्याय न मिळाल्याने त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी आपल्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीसाठी आपल्या दोन चिमूरड्यांसह बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
धक्कादायक म्हणजे सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस दलावर अविश्वास दाखवत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत, तर पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूला कारणीभूत तीन भाजपा कार्यकर्त्यांची नावे सुद्धा जाहीर केली आहे. ज्यात संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यकसुद्धा आहेत. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीसाठी व न्याय मिळविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन असा एल्गारही सुनीता देशमुख यांनी केला आहे.
चौकशी न केल्यामुळे सुनिता देशमुख यांचा संशय बळावला-
गेल्याच आठवड्यात पोलिसांनी पंकज देशमुख यांचा घातपात नसून आत्महत्या असल्याच प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं व आपल्या हात झटकले. मात्र कुटुंबीयांना अद्यापही परिस्थितीजन्य पुरावे, पंकज देशमुख यांच्या शरीरावर असलेल्या जखमा व काही संशयास्पद परिस्थितीमुळे पंकज देशमुख यांचा घातपात असल्याचा संशय आहे. पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक संशयतांची नावे दिली आहेत, ज्यात भाजप कार्यकर्ते व भाजपा संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक यांची सुद्धा नावे आहेत. मात्र पोलिसांनी अद्यापही त्यांची चौकशी न केल्यामुळे सुनिता देशमुख यांचा संशय बळावला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबीय लावून धरत आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही.
सुनिता देशमुख यांचा बुलढाणा पोलिसांवरही गंभीर आरोप-
चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय कुटे यांच्या घरी सांत्वन पर भेटीला आले असता बुलढाणा पोलिसांनी मला नजर कैदेत ठेवून नंतर ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात दोन तास बसवून ठेवल्याचाही गंभीर आरोप सुनिता देशमुख यांनी बुलढाणा पोलिसांवर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात भाजपचे आमदार संजय कुटे यांचे कार चालक पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर व मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या. जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं. पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात सुरू आहे. मात्र आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची त्यांनी तक्रार केली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.