दसरा मेळाव्याला येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ आणा; पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन
मुंबई : राज्यात, विशेषत: मराठवाड्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीची गरज आहे. सरकारने 2215 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून लवकरच ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, पण तेवढ्याने बळीराजाचे अश्रू पुसले जाणार नाहीत. गावागावातपावसाच्या पाण्याने घरांचेही नुकसान झाले असून आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वजण पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री आणि राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त पाहणी करत मदतही केली आहे. आता, पर्यावरणमंत्री पंकाजा मुंडे यांनीही दसरा मेळाव्याच्या (Dasara melava) निमित्ताने समर्थकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे.
दसरा म्हटलं की अनेकांनी एक्स्टसी असते ती शिवसेनेच्या आणि बीडमधील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची. यंदाही दोन्ही ठिकाणी दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. मात्र, यंदाच्या मेळाव्याला पूरग्रस्तांसाठीची भावनिक किनार आहे. महापुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात, गावात बेताची परिस्थिती निर्माण झाली, पूरग्रस्तांसाठी सरकार नक्कीच योग्य काही तरी निर्णय घेईल. यंदाचा आपला दसरा मेळावा म्हणजे मेळावा नाही, सभा किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, त्यानंतर मुंडे साहेबांनी त्या परंपरेला उंचीवर नेलं. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी यंदाच्या दसरा मेळावाही उत्साहात होणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, यंदाच्या दसरा मेळाव्याला येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ सोबत घेऊन या, असे आवाहनही पंकजा यांनी केलं आहे.
येताना चणा डाळ, गव्हाचे पीठ आणा
मी भगवान बाबांच्या दर्शनासाठी येत आहे, भगवान बाबांच्या चरणी, त्यांची पूजा करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येत आहे. आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. माझ्या भाषणाने तुम्हाला ऊर्जा मिळते तर तुमच्या दर्शनाने मला ऊर्जा मिळते. तुमच्या विराट रुपाचे दर्शन होते, वर्षभर संघर्ष करण्याची ऊर्जा या मेळाव्यातून मिळते. माझा दसरा मेळावा साधाच असतो, अठरापगड जाती धर्माचा संगम असलेली ही परंपरा आहे. त्यामुळे, पूरग्रस्त भागात यंदा ज्यांच्या घरात चूल पेटू शकत नाही, दसऱ्यादिवशी पुरणपोळी खाता येणार नाही, त्यांच्यासाठी आपण पुढे या. आपण सर्वजण दसरा मेळाव्यासाठी येत असताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ सोबत आणून भगवान बाबा चरणी अर्पण करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. तसेच, भगवान बाबा चरणी आलेला हा प्रसाद त्या पूरग्रस्त गावात पोहच करायचा आहे. त्यासाठी, भेटूया 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सावरगाव घाट भगवान भक्ती गड येथे, असे पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय
आणखी वाचा
Comments are closed.