Pankaja Munde Sushma Andhare: “पंकजा मुंडे यांना गृहमंत्री करा, तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”
पंकजा मुंडे सुषमा अंधारे : सातारा जिल्ह्यात घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) गृहमंत्री पद देणे आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करणे, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
Pankaja Munde Sushma Andhare: राज्यात पूर्णवेळ गृहमंत्र्यांचा अभाव
सचिन खरात म्हणाले, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्णवेळ महिला म्हणून पंकजा मुंडेंना गृहमंत्री पद द्यावं तसेच डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारे आवाज उठवत आहेत. त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावे, अशी देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Phaltan Doctor Death Case: साताऱ्याचे प्रकरण बीडला द्या, आरोपींची नार्को टेस्ट घ्या
खरात यांनी पुढे सांगितले की, “महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण साताऱ्यात घडलं असलं, तरी या प्रकरणातील गुन्हा बीड जिल्ह्यात चालवावा. यातील ज्या संशयितांचे नाव येत आहे, त्यांची नार्कोटेस्ट केली जावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणावरून सचिन खरात यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील थेट निशाणा साधलाय. ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे मोठमोठ्या मारतात, पण या प्रकरणात मोर्चा का काढत नाहीत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर टीका केली.
Phaltan Doctor Death Case: नेमकं प्रकरण काय?
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.