मला सगळं माहिती असतं तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या; पण मला.. पंकजा मुंडे गौर
Gauri Garje Palve Death Case : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉ. गौरी पालवे-गर्जे (Gauri Garje Palve Death Case) आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. डॉ. गौरी पालवे यांचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनंत गर्जे सध्या अटकेत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर काल (मंगळवारी, ता 25) पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यावेळी गौरी पालवेंच्या (Gauri Garje Palve Death Case) वडीलांनी पंकजा मुंडेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या, आपल्या मुलीला आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली, यावेळी मुंडे यांनी सांगितलं की यातून कोणीही सुटणार नाही. अनंत गर्जे याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या सोबतच मला याबाबत काहीही माहिती नाही. मला कल्पना असती तर मी अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या, पण मला याबाबत काही माहितीच नाही, मी तर कळलं तेव्हा खालीच बसले असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.(Gauri Garje Palve Death Case)
पंकजा मुंडे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात गौरी पालवेच्या घरी दाखल गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या भेटीदरम्यान गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली. सोबतच आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. मंत्री पंकजा मुंडे यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेदेखील भावुक झाल्या.
Gauri Garje Palve Death Case : मी कोणालाही फोन केलेला नाही
यावेळी गौरी पालवेच्या वडिलांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला गौरीच्या त्रासाबद्दल माहितीच नाही. नाहीतर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते की मी या प्रकरणात कोणालाही फोन केलेला नाही. सोबतच कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याकडे दहा पीए आहेत. पगारी नोकरांच्या घरात काय चाललंय हे कसे माहिती होईल. हे असं काही आहे ते नंतर मला समजलं, मला याबाबत काहीही माहिती नाही. मला कल्पना असती तर मी अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या, पण मला याबाबत काही माहितीच नाही, मी तर कळलं तेव्हा खालीच बसले असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मी पोलिसांना फोनही केला नाही, माझ्याकडे गणपतीला आले होते, नटून थटून इतका सुंदर जोडा, मला काही माहिती नाही. माझा मुलगा असा वागला असता तर मी त्यालाही पाठीशी घातलं नसतं, या प्रकरणात पोलिस पूर्ण तपास करतील.
Gauri Garje Palve Death Case : मला काय माहिती तुमच्या घरात काय चालू आहे
पोलीस ज्या केसमध्ये पुरावा नाही, अशा केसचाही छडा लावतात. या पूर्ण पृथ्वीवर अनंत गर्जेंची बाजू कोण घेतंय सांगा मला, कोण त्याच्यासोबत आहे का? पोलिसांना तपास तर करुन दिला पाहिजे ना, दोन दिवसात काय होणार आहे, पोलिस सर्व तपास करतील, मी पोलिसांना एकही फोन केलेला नाही. मला काय माहिती तुमच्या घरात काय चालू आहे. तुम्हाला एवढं माहिती असूनही तुम्ही काही करू शकले नाही मग आम्हाला तर माहितीचं नव्हतं. कोण एकमेकांना वैयक्तिक जीवनातील प्रश्न विचारतं, सज्जन माणूस विचारतो का? जरा धीर धरा, मला कसं वाटेल आपल्या लेकीसोबत असं व्हावं, असंही पुढे पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप तिचे वडील अशोक पालवे आणि आई अलकनंदा पालवे यांनी केला आहे.या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे या गौरी गर्जे हिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात दाखल झाल्या होत्या.
आणखी वाचा
Comments are closed.