पोलिसांनी कोर्टात अनंत गर्जेचा कच्चाचिठ्ठा उघडला, महिलेच्या गर्भपाताचा पुरावा मांडला, गर्जेच्या
अनंत गर्जे आणि गौरी गर्जे गुन्हा: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जेच्या (Anant Garje) पत्नी डॉ. गौरी गर्जे (Gauri Garje) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वरळी येथे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री गर्जेला अटक करण्यात आली आहे. आज अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Anant Garje & Gauri Garje Crime: कोर्टात नेमकं काय घडलं?
गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी तपास अधिकारीच गैरहजर असल्याने कोर्टाने सवाल उपस्थित केला. आरोपीचे महिलेशी संबंध असल्यामुळे आत्महत्या केली. पीएम रिपोर्ट बाकी आहे. गर्भपात लातूरच्या रुग्णालयात झाला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी वरळी पोलिसांनी मागणी केली.
मुंगी गर्जे आणि गौरारी गर्जे गुन्हा: आवश्यक वकील सोडणे
तर अनंत गर्जेचे वकील म्हणाले की, आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजार झालो आहोत. तपासाला आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्याकडून काहीही जप्त करायचं नाहीये. बहिणीचे नाव एफआयआरमध्ये आहे. पण ती कधी मुंबईत आली नाही. कमीत कमी पोलीस कोठडीची मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली. यानंतर अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Aant Garje & Gauri garje Crime: अनंत वकील म्हणजे काय?
आनंद गर्जेचे वकील मंगेश देशमुख माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. आमचे पक्षकार पोलिसांसमोर शरण आले. सरकारी वकिलांनी दहा दिवसाची कोठडी मागितली होती. मात्र, तीन दिवसाची कोठडी दिली आहे. गर्भपाताच्या ज्या घटनेचा पोलिसांनी उल्लेख केला आहे, ती 2021 पूर्वीची घटना आहे. आत्ताची कारणे वेगळी असून तपास यंत्रणा योग्य तपास करतील. गर्भपात प्रकरणी कागदपत्रे सापडली की नाही हे माहित नाही. पण हे प्रकरण 2021 सालाच्या पूर्वीचे आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने सगळं घडलं होतं. आरोपीने मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. रेफ्यूज एरियामधून अनंत गर्जे हे 29 व्या मजल्यावरून रूममध्ये गेले. त्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.