पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचललं, मुंबईत जीवन संपवलं
मुंबई: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळी बीडीडी येथे गौरी रहात होत्या, त्या केईएम रुग्णालय डेटिस विभागात कार्यरत होत्या. (pankaja munde PA anant garje wife dr Gauri Palave End her life at mumbai home)
मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी, ता 22) रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
अनंत गर्जे (anant garje) आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या, मोठ्या थाटामाटात ७ फेब्रुवारीला लग्न झालं होतं. अवघ्या दहा महिन्यांचा संसारात नेमकं काय घडलं, त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, तर अनंत गर्जे यांचे अफेअर असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे, कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे, अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा
Comments are closed.