मोठी बातमी! परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारचं टोकाचं पाऊल; जामिनावर सुटून
परभणी: परभणीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणीमध्ये संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार (Datta Sopan Pawar) याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ४ दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. दत्ता सोपान पवार (Datta Sopan Pawar) याने त्याच्या मिर्झापूर गावातील शेतात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जवळपास १३ महिन्यानंतर दत्ता सोपान पवार (Datta Sopan Pawar) याला जामीन मिळालेला होता. जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या गावी मिर्झापूर येथे तो आला होता. (Parbhani News)
Parbhani News: १३ महिन्यानंतर मिळाला होता दत्ता पवारला जामीन
परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार यांनी आपल्या शेतातील खोलीमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे, तब्बल 13 महिन्यानंतर दत्ता पवार (Datta Sopan Pawar) यांची दोन-तीन दिवसांपूर्वी जमानत झाली होती, यानंतर तो गावातच राहत होता. अशातच त्यानी आज सकाळी शेतातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.(Datta Sopan Pawar)
१० डिसेंबर 2024 रोजी परभणी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली होती त्याची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये दत्ता सोपान पवार याला अटक करण्यात आली होती. या घटनेच्या नंतर मोठे पडसाद परभणी शहरांमध्ये उमटले होते. देशपातळीवर या घटनेची दखल घेतली गेली आणि या प्रकरणातील दत्ता सोपान पवार हा जवळपास 13 महिने तुरुंगात होता.(Datta Sopan Pawar)
दोन-तीन दिवसांपूर्वीच त्याचा जामीन झाल्यानंतर ते तो त्याच्या मिर्जापुर या गावी गेला होता. आज त्यानी सकाळी त्याच्या शेतातील एका खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कळताच पोलीसही मिर्जापुर येथे दाखल झाले आहेत. दत्ता सोपान पवार याची पत्नी आणि दोन मुले हे पुणे येथे राहतात, तर त्याचे इतर नातेवाईक ही परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. जामीन झाल्यानंतर दत्ता पवार हा मिर्झापूर या गावी आला होता. दोन-तीन दिवस राहिल्यानंतर आज त्यानी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.