परिणय फुकेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं, म्हणाले, आजचा विजयी मेळावा देवेंद्र फडणवीसांसाठीच!
राज ठाकरेयुधव थ्रेडहव थ्रेडहावथायॅटिक व्हायोलर रॅली मुंबई: ठाकरे बंधूंची आजची सभा हि विजयी सभा नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आभाराची सभा असल्याचे म्हणत भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा संदर्भात जो निर्णय घेतला तो देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला, त्याची हि आभार सभा आहे. असेही ते म्हणाले.
ते फक्त मुंबई पालिका निवडणुकीसाठी एकत्र- परिणय फुके
महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांपूर्वी वेगळे झालेले राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आज (5 जुलै) मराठी मुद्द्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे त्या दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होते का? याकडे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषिक सूत्राच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध केला होता, त्यानंतर महायुती सरकारने एक पाऊल मागे घेत हा निर्णय सध्यासाठी पुढे ढकलला आहे. या निमित्ताने मराठी एकतेचा विजय साजरा करण्यासाठी आज वरळी येथील एनएससीआय डोम येथे विजय सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, जे ठाकरे बंधू एकत्र आल्याचे सांगितले जात आहे ते फक्त मुंबई पालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्याचेही फुके यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत देखील परिणय फुके यांनी व्यक्त केलंय.
समोर आलेल्या माहितीनुसार व्यासपीठावरती केवळ ठाकरे बंधू असणार आहेत. एन्ट्री सुद्धा ग्रँड होईल, अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असतील. मराठी विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होतील. (जर कांग्रेसचे नेते आले तर त्यांना भाषण दिलं जाईल, अशी शक्यता आहे.) शेवटी समारोपाचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असेल. यावेळी वरळी डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जातील.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.