वाळकेश्वरमध्ये इमारतीचा भाग चाळीवर कोसळला; ढिगाऱ्याखाली तिघे अडकले, अग्निशमन दलाने केली सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाळकेश्वर परिसरातील तीनबत्ती गल्ली येथे शनिवारी सकाळी तळ अधिक एक मजली इमारतीचा भाग चाळीवर कोसळला. या घटनेत एक पुरुष आणि दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अखेर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. वेबर टूल्सच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांची सुटका करण्यात आली.

Comments are closed.