डॉक्टर मृत्यूप्रकरणात मेहबूब शेख यांचा खळबळजनक दावा


मुंबई : फलटणमधील डॉक्टर आत्महत्येप्रकरणात (फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण) विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  याशिवाय याप्रकरणात दररोज नवनव्या घटना समोर येत आहेत. याप्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदनेने लपवलेला मोबाईल पोलिसांना सापडला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना पीडित कुटुंबाने तीन पानी पत्र दिलं आहे. आधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सलग तिसरी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकरांवर (Ranjit Singh Nimbalkar) हल्लाबोल केल्यानंतर, आता राष्ट्रवादी पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनीही नवा दावा केला आहे. पीडित डॉक्टरच्या कुटुंबाने मेहबूब शेख यांना तीन पानी पत्र दिलं आहे. या पत्रात अनेक दावे असून, हे पत्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना देणार असल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.

उपजिल्हा रुग्णालयातील (Satara Crime News)  डॉक्टर तरुणीने  गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) लिहून ठेवले होते. साताऱ्यातील फलटण येथील हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

‘ते’ पत्र शरद पवारांकडे देणार (Mehboob Shaikh on Sharad Pawar)

आता याबाबत मेहबूब शेख म्हणाले, “डॉक्टरची हत्या की आत्महत्या यासंदर्भात संशयच आहे पण यासंदर्भात पीडित कुटुंबियांनी काही मुद्दे या संदर्भात उपस्थित केले आहेत. मी देखील त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली होती तेव्हा या कुटुंबीयांनी मला एक पत्र दिला तीन पानाच या पत्रात त्यांनी 14 मागण्या या प्रकरणात उपस्थित केल्या आहेत. हे पत्र त्यांनी मला दिलं आहे. हे पत्र शरद पवार यांना त्या कुटुंबीयांनी द्यायला सांगितल आहे. ते पत्र आत्ता मी शरद पवार यांना देणार आहे. त्या कुटुंबियांची मागणी आहे की शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगव आणि या प्रकरणाची स्वतंत्र अशी एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आहे. त्याचसोबत हे प्रकरण फलटण येथील न्यायालयात न चालवता बीड येथे कोर्टात घ्यावं. कारण आम्हाला आता फलटण येथील पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर भरवसा राहिला नाही”

देवभाऊ तुमचा हा माजी खासदार इतका माज कसा करतो : मेहबूब शेख

पीडित कुटुंबियांच्या मागण्या आता तरी देवभाऊंनी ऐकव्यात आणि त्या मुलीला न्याय द्यावा, असं मेहबूब शेख म्हणाले.  तुमचे माजी खासदार आणि त्यांचे पीए यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या पत्रात पीडित कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे देवभाऊ तुमचा हा माजी खासदार इतका माज कसा करतो आणि तुम्ही या प्रकरणात त्यांना क्लीन चिट देता कसे, असे सवाल मेहबूब शेख यांनी विचारले आहेत.

गोपाल बदनेने लपवलेला मोबाईल अखेर सापडला

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीएसआय गोपाल बदनेने लपवलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.  पीएसआय बदनेच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केला. बदनेच्या मोबाईलमुळे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासाला गती येणार आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण (सातारा फलटण डॉक्टर मृत्यू)

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर काही मजकूर लिहून ठेवला होता, ज्यामध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणामुळे वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर दोघांकडूनच प्रशासकीय स्तरावर तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आरोपी पोलिस अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी फलटण पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक महाडिक यांनी जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधला होता. या चौकशीत महिला डॉक्टरने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अनेक गंभीर आरोप नोंदवले होते.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय? (Phaltan Satara News)

पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.

Mehboob Shaikh on Phaltan Doctor death case VIDEO: मेहबूब शेख यांचा खळबळजनक दावा

संबंधित बातमी:

डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला

Satara Doctor Crime News: हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.