मोटु का म्हणाला? शाळकरी मुलांमध्ये वाद, मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर धारधार शस्त्राने वार ve
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांना चिडवण्यावरुन वाद झाला आणि नंतर त्याने गंभीर वळण घेतले. मोटू का म्हणालास असा जाब विचारल्यानंतर हा वाद झाला आणि तो वाद सोडवण्यासाठी आलेल्या मित्रावरच धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. सांगवी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर विभग्योर शाळेबाहेर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मला मोटु म्हणून का चिडवतो? यावरुन सोमवारी दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. हा वाद नंतर चांगलाच वाढला. त्यानंतर चिडवणाऱ्या मित्राला धडा शिकवायचा, असं रागावलेल्या मित्राने ठरवलं.
दुसऱ्या दिवशी तो भावासह इतर तिघांना घेऊन शाळेबाहेर. तू माझ्या भावाला का चिडवतो, धारदार शस्त्र दाखवून भावासह मित्राने चिडवणाऱ्याला जाब विचारला. हे पाहून शाळेतील एक मित्र मध्यस्थी करायला पुढं आला. अशात चिडवणारा मित्र बाजूला राहिला अन् मध्ये पडलेल्या मित्रावरचं शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये त्या मित्राच्या डोक्यात, मानेवर अन हातावर जखमा झाल्या. डोक्यात टाकेही पडलेत. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.
पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दल हादरले आहे. स्वरुप जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात सध्या याबाबतचा तपास सुरु आहे.
पुण्यातील स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये स्वरुप जाधव हे राहत होते. राहत्या घरात गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याबाबतचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार स्वरुप जाधव हे पोलीस शिपाई म्हणून पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत होते. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे राहणारे आहेत. सध्या ते स्वारगेट येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.