पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंत
पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे, अशातच भाजपने त्या-त्या महानगपालिकेच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. तर पिंपरी-चिंचवड पालिकेसाठीच्या (Pimpri Chinchwad Mahanagar Palika) उमेदवारांची पहिली यादी उद्या रविवारी (दि. २८) जाहीर होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी काल (शुक्रवारी, ता २६) दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे, त्यांचीही तयारी जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर आझम पानसरे यांच्या घरी काल (शुक्रवारी, ता २६) भेट दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Pimpri Chinchwad Mahanagar Palika)
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये देखील जोरदार हालचाली सुरू आहेत. इच्छुकांची गर्दी मोठी असल्याने उमेदवारांची निवड करणे हे मोठे आव्हान बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठका पार पडल्या आहेत. यावेळी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थितीचा आढाव, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी आणि जिंकण्याची क्षमता यांचा आढावा घेण्यात आला, ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीबाबत एकमत झाले आहे, त्या नावांना प्राथमिक मान्यता दिली. अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे उद्या (रविवारी, ता २८) रोजी भाजपची पहिली यादी जाहीर होईल, अशी आमदार जगताप यांनी माहिती दिली.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून काळजी
उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज इच्छुक उमेदवार आणि अंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे. काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजांची समजूत घालणे, पर्यायी जबाबदाऱ्या देणे आणि संघटनात्मक पातळीवर त्यांना सक्रिय ठेवण्याची रणनीती आखली जात आहे.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: राष्ट्रवादीत काँग्रेसमध्येही घडामोडींना वेग
तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तयारीला वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून प्रभागनिहाय ताकद मोजणे, उमेदवारीवर चर्चा, प्रचार आराखडा आणि संभाव्य आघाड्यांबाबत बैठका सुरू आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी ठरले की सांगतो, एवढीच प्रतिक्रिया देत माध्यमांशी बोलणे टाळले.
आणखी वाचा
Comments are closed.