पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा हात धरणार? उदय सामंतांची अजित पवारांसोबत रात्री

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) अनुषंगाने शहरात पक्षांमध्ये अद्यापही युतीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये त्याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही, त्यानंतर पुणे पालिकेसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षासोबत युती करणार अशी चर्चा होती, शिवसेना नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांची भेट देखील घेतल्याची माहिती होती, तर दुसरीकडे सेनेच्या नेत्यांनी भाजपसोबत युती फिस्कटल्याची चर्चा केल्याचं दिसून आलं, मात्र मंत्री उदय सामंत यांनी सर्व गोष्टींची सारवासारव केली आणि अद्याप युती तुटली नसल्याचं सांगितलं अशातच आता शिवसेनेने (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर आघाडी करण्याची चाचपणी सुरू केल्याचं दिसून येत आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी दिली आहे.(Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026)

Shivsena And NCP: उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा केली.

भीमा कोरेगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी शिवसेनेसोबत आज चर्चा होणार असल्याचं सांगितलं, अजित पवार म्हणाले, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागातील जागा वाटपाचा तिढा सुटेल. ज्या ठिकाणी एबी फॉर्म जागा गेले आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणात जागा मागे घेण्यात येतील. सगळ्या निवडणुका तुम्ही आठवा, आमची सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांनी त्या जागा कुणाला द्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं कोणी यायचं एबी फॉर्म घेऊन जायचं नाराजी पसरलेली होती. आमची सचिन खरात बरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना दिले आहेत. काही जागा आम्ही तुतारीवर लढवत आहोत. उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबाबत बसून आम्ही काही जागांबाबत मार्ग निघतो का ते पाहू. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी तिथल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याला सांगितलं आहे. उदय सामंतांशी बोलणं झालं आहे, रात्री आम्ही बसून निर्णय घेऊ, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता शिवसेना भाजपला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.(Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026)

महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसंहिता आहे. महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे, जिल्हा परिषदची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. विदर्भातील जिल्हा परिषद, उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.
50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलंय.

Shivsena And NCP: रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली अजित पवार यांची भेट

महायुतीच्या जागावाटपामध्ये अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेकडून (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (अजित पवार) आघाडी करण्याची चाचपणी सोमवारी करण्यात आली. त्यानुसार शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, त्याबाबत सोमवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे) ही चाचपणी सुरू झाल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा

Comments are closed.