काकांसाठी स्वत: PM मोदींनी खुर्ची सरकववण्याचे चित्र गमतीचे, सामना आग्रलेखातून राऊतांची टोलेबाजी

संजय रत सामन: दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे.  या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी एकाच मंचावर उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीत बसवले, पवारांच्या ग्लासात पाणी ओतले.. हे चित्र मोठे गमतीचे आहे असे म्हणत साहित्य संमेलनाच्या मंचावर भरकटलेले किती आत्मे भटकत होते हे पाहायला हवे अशी फटकेबाजी सामन्याच्या अग्रलेखातून संजय राऊत(Sanjay Raut)  यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांच्या भाषणासह दिल्लीचेही तक्त राखणाऱ्या महाराष्ट्राचे भय वाटून साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात मोदी गेले नाहीत, असे समजावे का? असा सवालही त्यांनी केलाय.

आदर असता तर त्यांना ‘भटकती आत्मा’ म्हणाले नसते

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे यांच्या नावाने  पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत टोलेबाजी केल्याचे दिसले. मोदी यांना पवारांच्या प्रति आदर वगैरे असता तर शरद पवार म्हणजे ‘भटकती आत्मा’ अशी ही विशेषणे लावून जाहीर सभांमधून पवारांचा अपमान करण्याचा उद्योग पंतप्रधान मोदींनी केला नसता.. व परम आदरणीय पवारांचा पक्ष फोडून तो अजित पवारांच्या खिशात घातला नसता. त्या भटकत्या आत्म्यास अमित शहाणी काय शब्द वापरले? पवारांचे कृषी सहकार क्षेत्रात योगदान काय? पवारांनी महाराष्ट्राची लूट केली..’वगैरे मुक्ताफळे अमित शहा उधळतात हे काही आदर असल्याचे लक्षण नाही. काका पुतळ्यांनी महाराष्ट्र लुटला असे मोदी म्हणाले तो पुतण्या आज मोदींच्याच पक्षात आहे. काका साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदींसोबत बसले. काकांसाठी स्वतः मोदींनी खुर्ची सरकवली हे चित्र गमतीचे आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या मंचावर भरकटलेले किती आत्मे भटकत होते ते पाहायला हवे.. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘पंतप्रधान मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भान ठेवले असते तर बरे झाले असते’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विज्ञानभवनातील उद्घाटन समारंभाचा वेगळा घाट घालण्यावरून, साहित्य संमेलनातील उद्घाटन पर भाषणावरूनही संजय राऊत यांनी ‘सामना अग्रलेख -मोदींचे साहित्य (संमेलन)’ मधून तुफान टीका केली. ‘पंतप्रधान हे साहित्यविषयक कार्यक्रमात हजेरी लावतात तेव्हा त्यांनी व्यासपीठ आणि विषयाचे भान राखायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक कामांचे कौतुक करायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरणे योग्य नाही. राष्ट्रभक्तीची प्रेरणा व मराठी प्रेम आपल्याला संघामुळे समजले हे मोदींचे विचार, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होण्याच्या अनेक शतके आधी भारतवर्षात राष्ट्रभक्तीची व लढण्याची प्रेरणा होतीच. देव, देश व धर्मासाठी लढणारे महान लोक अनेक शतकांपूर्वी याच मातीत जन्मास आले. शिवरायांची भाषा मराठीच होती. स्वातंत्र्याच्या कोणत्याच लढ्यात ‘भाजप’ किंवा ‘संघ’ नव्हता. ते फक्त स्वातंत्र्याचा फुकट उपभोग घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीची ही उधार प्रेरणा त्यांना मिळते कोठून? याचा खुलासा कधीच झाला नाही. पंतप्रधान मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी भान ठेवले असते तर बरे झाले असते. मोदीजी तालकटोरावर आले नाहीत. का? त्यांना कसले भय वाटले? महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानी बाण्याचे की वाढत चाललेल्या गोडसे प्रवृत्तीचे?’ असा सवालही राऊतांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=EBMRD6_CNPQ

हेही वाचा:

संजय राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल, त्यांना नारळाच्या झाडाखालीच बसवा, शहाजीबापूंची जोरदार फटकेबाजी

अधिक पाहा..

Comments are closed.