मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

मुंबई : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या इंधनाच्या तुटवड्याबाबत, गॅस पुरवठ्याबाबत आणि इतरही महत्त्वाच्या बाबींसंदर्भाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. युद्धजन्य (War) परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात संसदेत बोलताना चिंता व्यक्त केली होती, कोरोनासारख्या परिस्थितीप्रमाणे आपण या परिस्थितीचा सामना करायला हवा, असेही मोदींनी म्हटले होते. त्यानंतर, आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी बैठक घेतली. त्यामध्ये, नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची चर्चा झल्याची माहिती आहे. मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांनी माहिती दिली.

पंतप्रधानांसमवेतच्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र शासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि 15 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्यावतीने भूमिका मांडली. या कठीण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नेतृत्व प्रदान केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आज अनेक देशांमध्ये विविध बंधने आहेत. कुठे वर्क फ्रॉम होम, कुठे वाहनांवर निर्बंध, कुठे कामाचे दिवस/तास कमी. कुठे आपत्कालीन स्थिती जाहीर, पण भारतात सामान्य परिस्थिती आहे. आजच एक्साइज शुल्कात केलेली कपात, ही सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बाब आहे. इतर देशात 20-30% दर वाढत असताना केंद्र सरकारने भार घेतला, पण सामान्यांवर बोजा वाढू दिला नाही, त्याबद्दल सुद्धा मोदींचे आभार. राष्ट्र प्रथम आणि भारतीय प्रथम या तत्त्वाचा मोठा लाभ झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

गेल्या 11 वर्षात केलेले प्रयत्न भर घालणारे.

ऊर्जा स्त्रोतांचे विकेंद्रीकरण. आधी 27 देशातून, आता 41 देशातून आयात होते. त्यामुळे त्या स्थितीत जे संकट आले असते, ते आता आलेले नाही. ई-बसेस, सोलर ऊर्जेसाठी घेतलेला पुढाकार यामुळे सुद्धा ऊर्जा स्त्रोतांचे विकेंद्रीकरण झाले. एलपीजी पुरवठा सामान्य सुरू आहे. आत्मनिर्भरता अभियानाचे निश्चित फायदे झाले आहेत.

खतांची पुरेश उपलब्धता

खतांची पुरेशी उपलब्धता आहे. राज्यात सुद्धा त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. जे लोक काळाबाजारी, साठेबाजी यात गुंतले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. शेतीशी संबधित बाबी आम्ही अग्रिस्टॅकशी जोडतो आहोत. त्यामुळे कुणाला काळाबाजारी करता येणार नाही. सातत्याने बैठका घेऊन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पीएनजीसाठी गती देण्याचं काम

दरम्यान, पीएनजीसाठी संपूर्ण गती देण्यात आली असून यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’चा अवलंब केला जात आहे. टाईमलाईनचे पालन केले जाते आहे. ज्या काही सूचना केंद्र सरकारकडून येतील, त्याचे संपूर्ण पालन महाराष्ट्र सरकार करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी या बैठकीत म्हटले.

हेही वाचा

LPG Crisis : घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरचा खरचं तुटवडा आहे का? सरकारकडे किती साठा शिल्लक? महत्वाची माहिती समोर

आणखी वाचा

Comments are closed.