अयोध्या-जनकपुरी रेल्वेचे उद्घाटन, हिंदुस्थानकडून नेपाळसाठी आर्थिक पॅकेजही जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या आणि देवी सीता यांचे जन्मस्थान जनकपूर या शहरांदरम्यान आजपासून रेल्वेसेवेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी हिरवा झेंडा दाखवून या दोन शहरांना जोडणाऱ्या शरयू-कमला एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. याशिवाय नेपाळसाठी आर्थिक पॅकेजदेखील जाहीर करण्यात आले.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे १०० मिनिटे चर्चा केली. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल, अर्थमंत्री स्वर्णिम वागळे यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर शरयू-कमला एक्स्प्रेसचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ केला. या गाडीची नियमित सेवा २८ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

नेपाळला १५ हजार कोटींची मदत

नेपाळसाठी हिंदुस्थानने १५ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यापैकी काही रक्कम ही कर्ज स्वरुपात असेल. याशिवाय दोन्ही देशांमध्ये काठमांडू-भैरहवा-लखनऊ या हवाई मार्गाच्या दोन्ही दिशेने होणाऱ्या वापराबाबत मंजुरी देण्यात आली. मात्र, काठमांडू-महेंद्रनगर या हवाई मार्गाबाबत सहमती झालेली नाही. उड्डाणांच्या उंचीवरून मतभेद आहेत. याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित ८ सामंजस्य करार करण्यात आले.

Comments are closed.