दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (PMC Election 2026) अनुषंगाने निर्माण झालेला दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती समोप आली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा निघाला आहे. दुपारी तीन नंतर आमच्या जागांची संख्या क्लियर होईल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी मिळून १६५ जागावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.(PMC Election 2026)

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी युतीबाबत माहिती देताना सांगितलं की, दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एकाच प्रभागातून अर्ज दिला होता, पण आता ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिथे संधी दिली जाणार आहे. दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीत होते, चर्चेनंतर हा निर्णय घेतील. 9 ठिकाणी उमेदवारी अर्ज आहेत. जिथे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी भरले आहेत अशा उमेदवारांसोबत चर्चा होईल. आम्ही 125 आम्ही एबी फॉर्म (ab form) दिलेले आहेत. त्यांनी 35 च्या वरएबी फॉर्म (ab form) दिले होते. राष्ट्रवादी दोन्ही आणि खरात गट अशी युती असेल, असंही सुनील टिंगरे यांनी माहिती देताना सांगितलं आहे.

PMC Election 2026: पुण्यात शिवसेना १२३ ठिकाणी लढवणार निवडणूक

तर दुसरीकडे अद्याप भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट आहे. पुण्यात शिवसेना १२३ ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. तर पुण्यात शिवसेना भाजप युतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कोणतीही चर्चा झालेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास फक्त काहीसा वेळ शिल्लक राहीला आहे. अद्यापही एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना वरिष्ठ नेत्यांकडून संपर्क नाही अशी माहिती आहे. भाजपकडून सेनेला फक्त १६ जागा देण्यात आल्या होत्या. दुपारी तीन नंतर चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.

PMC Election 2026: पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.